विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

पुणे, ता. २ : आंबेगाव तालुक्यातील माळीण परिसरातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवरून रोज पाच किलोमीटर पायी शाळेत जाणाऱ्या १० विद्यार्थ्यांना (पाच मुले आणि पाच मुली) नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले.

‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या ‘सायकल बँक’ उपक्रमांतर्गत व पुण्यातील ‘के अँड क्यू परिवारा’च्या सहकार्याने ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी ‘के अँड क्यू परिवारा’चे सत्येंद्र राठी, मनोज मुछाल, सकाळ सोशल फाउंडेशनचे विश्वस्त महेंद्र पिसाळ उपस्थित होते. के अँड क्यू परिवार सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. या संस्थेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त व ‘सायकल डे’च्या निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी टीना पेरीवाल, निशित माहेश्वरी, संध्या सोमाणी, वैष्णवी राठी, राजाभाऊ मालपाणी व संजय जाजू यांचे सहकार्य लाभले.


या विद्यार्थ्यांना मिळाली सायकल
स्मिता माळी व पल्लवी भालचिम (पसारवाडी), मनीषा खरात (वचपे), सुजल तळपे (तळपेवाडी), गणेश शेळके (पंचाळे), गौरी लेंभे, नितीन लेंभे व सूरज लेंभे (चिंचेवाडी), नेहा शेळके व दीपक शेळके (अडिवरे).


‘सायकल बँके’ला करा मदत...
जास्तीत-जास्त गरजू विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणाला हातभार लावण्यासाठी सायकल बँक प्रकल्पाला ‘सीएसआर’ निधी व समाजातून सामूहिक मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या, औद्योगिक कंपन्या https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, सायकल बँक उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटनावर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. तसेच, या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्यास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

सायकल करा दान
आपल्या पाल्याला शिक्षणासाठी सायकल घेऊन दिलेली असते. शिक्षणानंतर ती सायकल घरात वापराविना पडून असते. अशा सुस्थितीतील सायकल आपण देणगी म्हणून देऊ शकता. जमा झालेल्या सायकलींचे विविध ठिकाणच्या ग्रामीण भागातील गरजू शालेय विद्यार्थांना वाटप करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com