हीलिंग गार्डन ऑनलाइन कार्यशाळा

हीलिंग गार्डन ऑनलाइन कार्यशाळा

पुणे, ता. २ : मन, शरीर आणि आत्मा यांचे पालनपोषण करणाऱ्या हीलिंग गार्डनविषयी माहिती देणारी ऑनलाइन कार्यशाळा बुधवारी (ता. ५) आयोजिली आहे. आरोग्य व तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आयुर्वेदिक उपचारात्मक वनस्पतींची लागवड असणारी हीलिंग गार्डन ही संकल्पना आहे. आराम, तणाव कमी करणे आणि भावनिक उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी व निसर्गाचे उपचारात्मक स्वरूप समजण्यास हीलिंग गार्डन मदत करते. ही कार्यशाळा लँडस्केप आर्किटेक्चर, गार्डन डिझायनर, आरोग्यसेवा व मानसशास्त्र संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक आणि उत्साही लोकांसाठी उपयुक्त आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२

चहा व्यवसायातील संधी
भारतात सर्वाधिक लोकप्रिय पेय चहा आहे. चहाच्या व्यवसायात तोटा सहन करावा लागत नाही, असाही अनेकांचा अनुभव आहे. प्रसिद्ध झालेल्या ब्रँडच्या फ्रॅंचायजी घेऊन व्यवसाय सुरु करण्याकडे अनेकांचा कल आहे. अमृततुल्यपासून ते गुळाच्या चहापर्यंत असे चहाचे अनेक प्रकार बघायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर कुठल्याही ब्रँडचा आधार न घेता स्वतःच्या हिमतीवर चहा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या चहाचे प्रशिक्षण ८ व ९ जूनला आयोजिले आहे. यामध्ये चहाचे प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात येतील, तसेच मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेऊन ऑनलाइन व्यावसायिक चहा विक्री कशी करायची?, स्वतःचा ब्रँड कसा उभा करायचा?, चहाची विक्री कशी वाढवायची? याबाबत मार्गदर्शन होईल. प्रशिक्षणानंतर थेट व्यवसाय करण्याची व स्वतःच्या कॅफे, हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादी आस्थापनांची चहा विक्री वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.
संपर्क : ९१४६०३८०३१

सी फूड डिशेस ऑनलाइन कार्यशाळा
मासे हे प्राचीन काळापासून लोकांच्या खाद्यसंस्कृतीचा भाग आहेत. त्यातील उच्च पोषणमूल्य आणि चवीमुळे आहारात त्यांचा समावेश करावा, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत. मधुर व रसाळ अशा सीफूड पाककृती शिकवणारी ऑनलाइन कार्यशाळा ९ जूनला आयोजिली आहे. यात माशांचे मॅरिनेशन व त्याचा मसाला तसेच स्वयंपाकाचे व मासे तळण्याचे योग्य तंत्र यासह अस्सल मालवणी फिश करी, कोकणी फिश करी, तवा फिश फ्राय, कोळंबी कोळीवाडा, कोळंबी पुलाव, अस्सल सोलकढी या सी फूड डिशेस शिकवण्यात येतील. कार्यशाळेपूर्वी पीडीएफ नोट्स शेअर केल्या जातील.
संपर्क : ९१४६०३८०३१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com