नाकाबंदीत पोलिस अधिकाऱ्याने तरुणाकडून पाय चेपून घेतले!

नाकाबंदीत पोलिस अधिकाऱ्याने तरुणाकडून पाय चेपून घेतले!

पुणे, ता. २ : कल्याणीनगर परिसरात शनिवारी (ता. १) मध्यरात्री नाकाबंदीच्या वेळी एका तरुणाकडून पोलिस अधिकाऱ्याने पाय चेपून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. ही चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर शहर पोलिस दलात चर्चेचा विषय झाला होता. दरम्यान, सततच्या बंदोबस्तामुळे त्या अधिकाऱ्याचे पाय दुखत असल्याने त्यांना तरुणाने मदत केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

कल्याणीनगरमधील पोर्श मोटार अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी मद्यपी आणि भरधाव वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात येत आहे. कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पोलिस पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी एका मोटारीतून निघालेल्या तरुणांना पोलिसांनी अडविले. पोलिसांनी सणसवाडीतील त्या तरुणांची चौकशी केली. त्यानंतर नाकाबंदीतील एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला पाय चेपण्यास सांगितले. ही चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.

दरम्यान, संबंधित पोलिस अधिकारी सलग दोन रात्री आणि दिवसा बंदोबस्तात तैनात होते. सततच्या बंदोबस्तामुळे त्यांचे पाय दुखत असल्याने ते अचानक खाली बसले. त्यामुळे त्या तरुणाने अधिकाऱ्यास मदत केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com