प्रशासन सज्ज

प्रशासन सज्ज

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : राज्यात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या (मंगळवारी) सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये, शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये, तर मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे.

अशी होईल मतमोजणीला सुरुवात
सकाळी मतदान यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे (स्ट्राँग रूम) सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढण्यात येईल. आवश्यक ती प्रक्रिया करून मतमोजणीला प्रारंभ केला जाईल. सकाळी ८ वाजता टपाली मतदान आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी सुरू होईल. मतदान यंत्रांच्या मतमोजणीची सुरुवात ८ वाजून ३० मिनिटांनी होईल. मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार असून, याशिवाय व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे.

विधानसभानिहाय टेबल आणि फेऱ्यांची रचना
पुणे लोकसभा मतदारसंघ (एकूण टेबल : ११२)
विधानसभा मतदारसंघ-टेबल-फेऱ्या
वडगाव शेरी-२२-२१
शिवाजीनगर-१४-२०
पुणे कॅन्टोन्मेंट-१४-२०
कसबा पेठ-१४-२०
कोथरूड-२०-२०
पर्वती-१८-२०
पोस्टल, ईटीपीबीएस-१०---

बारामती लोकसभा मतदारसंघ (एकूण टेबल : १२४)
विधानसभा मतदारसंघ-टेबल-फेऱ्या
दौंड-१४-२३
इंदापूर-१६-२१
बारामती-१८-२२
पुरंदर-२०-२२
भोर-२४-२४
खडकवासला-२२-२४

शिरूर लोकसभा मतदारसंघ
विधानसभा मतदारसंघ-टेबल-फेऱ्या
जुन्नर-१४-२५
आंबेगाव-१४-२
खेड-आळंदी-१६-२४
शिरूर-१६-२७
भोसरी-२०-२३
हडपसर-२०-२६
पोस्टल व ईटीपीबीएस-१२---

मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती (एकूण २ हजार ७०)
ईव्हीएम मतमोजणी
मतमोजणी सहाय्यक-६५६
मतमोजणी पर्यवेक्षक-६००
सूक्ष्म निरीक्षक-६४०
एकूण १ हजार ८९६
टपाली व ईटीपीबीएस मतमोजणी
मतमोजणी पर्यवेक्षक-४७
मतमोजणी सहायक-६९
सूक्ष्म निरीक्षक-५८
एकूण ७४

लोकसभा मतदारसंघनिहाय नियुक्त अधिकारी
ईव्हीएम मतमोजणी
मावळ लोकसभा
मतमोजणी सहाय्यक-१६२
मतमोजणी पर्यवेक्षक-१३७
सूक्ष्म निरीक्षक-१५८
पुणे लोकसभा
मतमोजणी सहाय्यक-१६८
मतमोजणी पर्यवेक्षक-१५९
सूक्ष्म निरीक्षक-१६३
बारामती लोकसभा
मतमोजणी सहाय्यक-१६४
मतमोजणी पर्यवेक्षक-१५२
सूक्ष्म निरीक्षक-१५३
शिरूर लोकसभा
मतमोजणी सहाय्यक-१६२
मतमोजणी पर्यवेक्षक-१५२
सूक्ष्म निरीक्षक-१६६

पोस्टल व ईटीपीबीएस
मावळ लोकसभा
मतमोजणी सहाय्यक-१४
मतमोजणी पर्यवेक्षक-सात
सूक्ष्म निरीक्षक-आठ
पुणे लोकसभा
मतमोजणी सहाय्यक-१९
मतमोजणी पर्यवेक्षक-१२
सूक्ष्म निरीक्षक-१४
बारामती लोकसभा
मतमोजणी सहाय्यक-२०
मतमोजणी पर्यवेक्षक-१०
सूक्ष्म निरीक्षक-१८
शिरूर लोकसभा
मतमोजणी सहाय्यक-१६
मतमोजणी पर्यवेक्षक-१८
सूक्ष्म निरीक्षक -१

वाहनतळ व्यवस्था
पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी येणारे मनुष्यबळ व उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी, नागरिक यांच्यासाठी वाहनतळाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. पूज्य कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे ६०० ते ७०० वाहनक्षमता असलेले दुचाकी वाहनतळ फक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी रोही व्हिला लॉन्स लेन नं. ७, कोरेगाव पार्क येथे ६०० ते ७०० वाहनक्षमतेचे दुचाकी व चारचाकी वाहनतळ, तर द पूना स्कूल ॲण्ड होम फॉर द ब्लाइंड ट्रस्ट, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी ८०० ते ९०० वाहनक्षमता असलेल्या चारचाकी वाहनतळाचे नियोजन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com