प्रमाणपत्र नसलेल्या एजंटवर 
महारेराचा कारवाईचा बडगा

प्रमाणपत्र नसलेल्या एजंटवर महारेराचा कारवाईचा बडगा

पुणे, ता. ३ : प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर धडक कारवाई करत तब्बल २० हजार एजंटची नोंदणी महारेराने नुकतीच रद्द केली आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच १७ जूनपासून सुरु होत आहे.
संपर्क : ८९५६३४४४७५

सोसायटी मॅनेजर प्रमाणपत्र अभ्यासक्रम
गृहनिर्माण सोसायट्यांना व्यवस्थापकांची गरज असते. याबद्दलचा तीन दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम शुक्रवारपासून (ता. ७) सुरू होणार आहे. अभ्यासक्रमात सोसायटीच्या प्राथमिक नोंदी, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, वार्षिक सर्वसाधारण सभेचा अजेंडा आणि कार्यवृत्त लेखन, शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले, बँक व कॅश व्हाउचर, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल, वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ९३५६९७३४२७

टेरॅरियम मेकिंग कार्यशाळा
घराची शोभा वाढवणारे टेरॅरियम घरच्या घरी सहज तयार करता येऊ शकतात आणि यासाठी लागणाऱ्या विविध वनस्पती कुठल्याही रोपवाटिकेत सहज उपलब्ध असतात. याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. ९) आयोजिली आहे. यात टेरॅरियमच्या अद्भुत जगाचा परिचय, इकोसिस्टमचे कार्य, योग्य कंटेनर व वनस्पती निवड, मातीची रचना व सब्सट्रेटची निवड, सजावटीचे घटक व लँडस्केपिंग, टेरॅरियम एकत्र करणे व लावणे, पाणी देण्याची आणि देखभाल पद्धती, कीटक व्यवस्थापन, प्रगत टेरॅरियम डिझाइन व तंत्र, टेरॅरियम लाइटिंग व पर्यावरणविषयक विचार, टेरॅरियम डिझाइनची तत्त्वे व सौंदर्यशास्त्र, टेरॅरियम थीम व प्रेरणा, टेरॅरियम विक्री व विपणन धोरणे आदींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८९५६३४४४७२

लहान मुले, ज्येष्ठांसाठी नेचर वॉक
निमोफिलिस्टच्या सहकार्याने लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्गाच्या अद्भुत रूपांची ओळख करून देणारी व सलग चार शनिवारी आयोजिलेली शैक्षणिक सहल शनिवारपासून (ता. ८) सुरु होत आहे. शहरातील आणि परिसरातील विविध भूदृश्ये, वन्यजीव, विविध वनस्पती, जीवजंतू, जंगले, उद्याने, पाणथळ जागांचे निरीक्षण, अन्वेषण व मार्गदर्शनपर माहिती यामध्ये सांगितली जाणार आहे. मुलांना नैसर्गिक जगाची सखोल ओळख व्हावी, त्यांची पर्यावरणीय समज वाढावी, आजी-आजोबांच्या काळातील निसर्ग व आजचा निसर्ग यातील फरक समजून येऊन पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात यावी, सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती वाढावी हा या सहलीमागचा उद्देश आहे. नेचर वॉकला अनुभवी निसर्गशास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ९३५६९७३४२७

एफपीसी अकाउंटंट ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग
शेतकरी उत्पादक कंपनीचा (एफपीसी) अकाउंटंट (लेखा अधिकारी) हा ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग ७ ते ९ जून दरम्यान होणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांचे वित्त व्यवस्थापन करण्यासाठी तसेच विविध अनुपालन व वित्त सेवा प्रदान करणाऱ्या सीए फर्ममध्ये कुशल अकाउंटंटची गरज भासते. कॉमर्स पदवीधर व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे. प्रशिक्षणादरम्यान शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली, बुक किपिंगचे महत्त्व, या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
प्रशिक्षणार्थ्यांचे रिझ्युम (सीव्ही) सीव्ही फोल्डरमध्ये समाविष्ट करून त्यांना रोजगार संधींची माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
संपर्क : ९३०७६४९०४७
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com