‘समर युथ समिट’ची उत्सुकता शिगेला

‘समर युथ समिट’ची उत्सुकता शिगेला

पुणे, ता. ३ : आर्थिक उन्नतीचे ज्ञान, सामाजिक जाण आणि देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी ‘यिन’च्या वतीने ‘समर युथ समिट २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील हजारोंच्या संख्येने तरुणाई या समिटसाठी ११ जून रोजी पुण्यात दाखल होत असून, सर्वच क्षेत्रातील दिग्गजांचे सानिध्यही त्यांना लाभणार आहे.
समाजातील विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे संघटक ‘यिन’च्या माध्यमातून निर्माण झाले आहे. दरवर्षी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा नेतृत्व विकास होता. त्या टप्प्यातील समर युथ समिट हा महत्त्वाचा उपक्रम आहे. विविध क्षेत्रात एक वेगळी उंची गाठणारे मान्यवर त्यांच्या यशाचे गमक तरुणाईसमोर ठेवणार आहेत. एकप्रकारे यशाची गुरुकिल्लीच ते उपस्थितांना सांगणार आहेत. पिंपरी-चिंचवड विद्यापीठ व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, असोसिएट स्पॉन्सर ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल आणि महाएनजीओ फेडरेशन यांनी समिटला पॉवर्ड केले आहे.

युवकांमधील सकारात्मक बदलांसाठी ‘यिन’चे उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शिक्षणासोबतच इतर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची रुची निर्माण होत आहे. याच अनुषंगाने ‘यिन समर युथ समिट’मध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे गरजेचे आहे.
- डॉ. निवेदिता एकबोटे,
उपकार्यवाहक, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा अवलंब करत ‘यिन’ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने या समर युथ समिटमधून नक्कीच सकारात्मक चर्चा घडणार आहे.
- डॉ. देविदास गोल्हार,
प्राचार्य, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स

महाविद्यालयीन तरुणाईसाठी करियरच्या, भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजेच ‘यिन समर युथ समिट’ होत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, ते नक्कीच कौतुकास्पद आहेत.
- डॉ. अजित काटे,
प्राचार्य, झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संवेदनशीलता, सामाजिक भान, देशाभिमान व नैतिक मूल्यवर्धित शिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘यिन’ने केलेली वाटचाल निश्चितच गौरवास्पद आहे. त्याचदृष्टीने समर युथ समिट हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भावी काळासाठी, जडणघडणीसाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे.
- पायल मेहता,
संचालक, निलया ग्रुप ऑफ एज्युकेशन, पुणे

अधिक माहितीसाठी : पुणे यिन समन्वयक शंतनू पोंक्षे मो. नं ९८८१५०४४९२ / ८६६८५३४१५१
‘समर युथ समिट २०२४’ मध्ये सहभागासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा, तसेच ऑनलाइन अॅपवरूनही नावनोंदणी करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com