प्रवेशाबाबत मिळणार एकाच छताखाली मार्गदर्शन!

प्रवेशाबाबत मिळणार एकाच छताखाली मार्गदर्शन!

पुणे, ता. ३ : दहावी-बारावीनंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना करिअरची नेमकी दिशा ठरविण्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ’च्या वतीने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शैक्षणिक प्रदर्शन शुक्रवारी (ता. ७) सर्वांसाठी खुले होणार आहे.
शहरासह राज्यातील जवळपास ३५ हून अधिक नामांकित शिक्षण संस्थांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती या प्रदर्शनाच्यानिमित्ताने विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळणार आहे. ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’चे निकमार युनिव्हर्सिटी हे ‘पॉवर्ड बाय स्पॉन्सर’ असून भारती विद्यापीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे विद्यापीठ, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स ‘असोसिएट स्पॉन्सर’ आहेत तर मराठवाडा मित्र मंडळ आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे ‘को- स्पॉन्सर्स’ आहेत. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचे पर्याय आणि त्यावर आधारित मार्गदर्शनपर चर्चासत्रे येथे आयोजित केली जाणार आहेत. अकरावी-बारावी यांसह पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रम, तसेच विविध कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेस्‌ची माहिती येथे मिळणार आहे.
दहावी-बारावीनंतर अभ्यासक्रम निवडताना, करिअरची दिशा ठरविताना नेमके काय करावे, कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याबाबत विद्यार्थी-पालकांना तज्ज्ञ, अभ्यासक, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधता येणार आहे. प्रदर्शनानिमित्त आयोजित चर्चासत्रात विद्यार्थी-पालकांना विनामूल्य सहभागी होता येणार आहे. याशिवाय करिअरविषयक समुपदेशनही मिळू शकणार आहे.


‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ची माहिती
कधी : ७, ८, ९ जून २०२४
केव्हा : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत
कोठे : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर

वैशिष्ट्ये....
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, जैव अभियांत्रिकी, मरिन इंजिनिअरिंग, व्यवस्थापन, वैद्यकीय/ पेरा मेडिकल, बांधकाम, वास्तुशास्त्र, डिझाइन, माहिती-तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता, लिबरल आर्ट्स, फिल्म ॲण्ड ॲनिमेशन, जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांची तयारी, एव्हिएशन, करिअर समुपदेशन, परदेशी शिक्षण, कौशल्यप्रधान व्यावसायिक प्रशिक्षण, हॉटेल व्यवस्थापन, विधी अभ्यासक्रम, फॅशन डिझायनिंग ॲण्ड इंटेरियर डिझायनिंग अशा विविध विषयांवरील माहिती उपलब्ध होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ९८८१०९८४४८/९३२४१२१८११

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com