फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था

फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था

पुणे, ता. ३ ः लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मतमोजणी केंद्रांच्या परिसरासह शहरात विविध ठिकाणी अडीच हजार फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. कोरेगाव पार्क, म्हाळुंगे-बालेवाडी या परिसरासह विविध ठिकाणी ही सोय केली जाईल.
पुणे, मावळ व बारामती या तीन लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची प्रक्रिया मंगळवारी (ता. ४) रोजी पार पडणार आहे. पुणे व बारामती मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील खाद्य निगम गोडाऊन, तर मावळ मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. या दोन्ही केंद्रांसह खडकवासला, सुरक्षा कक्ष, मतमोजणी कक्ष, नियंत्रण कक्ष साहित्य वाटप, घोरपडे पेठ, कसबा पेठ अशा ठिकाणी फिरती स्वच्छतागृहे ठेवली जातील, अशी माहिती या विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com