पोलिसाकडून एकाला रॉडने मारहाण

पोलिसाकडून एकाला रॉडने मारहाण

पुणे, ता. ६ : ‘पोलिस लाईनमध्ये कशाला येता’ असे म्हणत पोलिस कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. बुधवारी (ता. ५) दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वारगेट पोलिस लाईनमध्ये हा प्रकार घडला.
याबाबत सोमनाथ राजाराम शेडगे (वय ४५, रा. घोरपडे पेठ, खडकमाळ आळी) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिस शिपाई मंगेश दिलीप कांबळे (रा. स्वारगेट पोलिस लाईन) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेडगे हे स्वारगेट पोलिस लाईनच्या शेजारी राहण्यास आहेत. मंगळवारी (ता. ४) त्यांच्या मित्राच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी ते कात्रज येथे गेले होते. दरम्यान, शेडगे यांनी त्यांच्या मित्राची दुचाकी पोलिस लाईनमध्ये पार्क करून त्यांच्या मोटारीमधून कात्रज येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत आल्यानंतर शेडगे व त्यांचा मित्र पोलिस लाईनमध्ये दुचाकी घेण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी मंगेश कांबळे त्याठिकाणी आले. त्यांनी ‘तुम्ही कोण आहे’ अशी विचारणा केली असता शेडगे यांनी ‘आमची गाडी पार्क केली होती ती घेण्यासाठी आल्याचे’ सांगितले. त्यावेळी मंगेश कांबळे याने ‘तुम्ही इथे थांबू नका, येथून निघून जावा’ असे सांगितले. तसेच ‘तुम्ही पोलिस लाईनमध्ये कशाला येता’ असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच स्टीलचे ताट तोंडावर मारून शेडगे यांना जखमी केले. शेडगे कांबळेच्या मागे पळाले असता कांबळे याने घरातून रॉड आणला. ‘मी पोलिस आहे हे तुला माहीत आहे का’ असे म्हणून शेडगे यांच्या पाठीवर व डोक्यात मारून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com