पदव्युत्तर पदविकेचा
आता प्रगत अभ्यासक्रम

पदव्युत्तर पदविकेचा आता प्रगत अभ्यासक्रम

पुणे, ता. १० ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तविद्या विभागातील पदव्युत्तर पदविकांच्या नावात बदल करण्यात आला आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध अभ्यासक्रमांमध्ये बदल झाले आहेत. त्यानुसार दोन अभ्यासक्रमांची नावे बदलण्यात आली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सहकार्याने चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदविकेचे नाव आता पत्रकारिता प्रगत अभ्यासक्रम असे करण्यात आले आहे. संध्याकाळी चालणारा ‘पोस्टग्रॅज्युएट्स डिप्लोमा इन डिजिटल मीडिया या अभ्यासक्रमाला आता ‘ॲडव्हान्स कोर्स इन डिजिटल मीडिया’ असे नाव देण्यात आले आहे. दोन्ही अभ्यासक्रम ४४ श्रेयांकांचे आहेत. ते दोन सत्रांमध्ये चालविण्यात येतील. कोणत्याही विद्याशाखेचे पदवीधर किंवा शेवटच्या सत्राची परीक्षा दिलेले विद्यार्थी यासाठी प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश घेऊ शकतात. याची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. संजय तांबट यांनी दिली.
----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com