‘महाविकास’च्या उमेदवारांना
‘भटक्या विमुक्त’चा पाठिंबा

‘महाविकास’च्या उमेदवारांना ‘भटक्या विमुक्त’चा पाठिंबा

पुणे, ता. ४ ः देशाची राज्यघटना बदलू इच्छिणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेतून दूर करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीच्या आणि देशभरात इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात येणार आहे, अशी घोषणा माजी आमदार लक्ष्मण माने आणि माजी आमदार ॲड. विजय मोरे यांनी गुरुवारी केली.


आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आपली भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. गेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे भाजप सत्तेमध्ये आला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला समर्थन देण्यासाठी आपण उमेदवार उभे करू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांना केले आहे. मात्र, लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढविण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे, असे माने म्हणाले.

संघटनेच्यावतीने ९ एप्रिल ते ९ मे दरम्यान राज्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या बांधवांनी जयंती महोत्सवात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन माने यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com