मनोस्मित नृत्यालयातर्फे ‘पालवी’ महोत्सव

मनोस्मित नृत्यालयातर्फे
‘पालवी’ महोत्सव

पुणे, ता. ३० : मनोस्मित नृत्यालयातर्फे टिळक रस्ता येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहामध्ये ‘पालवी’ महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात ‘जिजा- कथा स्वराज्य सारथीची’ या नृत्यनाटिकेचे सादरीकरण झाले. यामध्ये मनोस्मित नृत्यालयाच्या संचालिका मानसी कांबळे यांच्यासह २८ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. श्रवणीय संगीत, उत्तम नृत्यसंरचना व चित्तथरारक कथानकाने नृत्यनाटिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. स्वराज्यजननी जिजामाता यांच्या जीवनपटावर भाष्य करणाऱ्या या नृत्यनाटिकेत ५ ते ४३ वर्षे वयोगटातील नृत्यांगणांनी सहभाग घेतला होता. या वेळी लक्ष्मी रस्ता येथील हुजूरपागा शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री मुजुमले व स्नेहललित कला केंद्राच्या संचालिका गुरू स्नेहल कळमकर उपस्थित होत्या. योगिता शिंदे, दीप्ती सेवलकर व अक्षय मोरे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.
..........
‘अन् मी शिक्षक झालो’
आत्मचरित्राचे प्रकाशन
पुणे, ता. ३० : लेखक गे. रा. थोरवे गुरुजी यांनी त्यांच्या वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी लिहिलेल्या ‘अन् मी शिक्षक झालो’ या आत्मचरित्राचे प्रकाशन साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी होते, तसेच प्रा. राम आबणे, प्राचार्य मोहन कांबळे, प्रा. मधुकर थोरवे, बाळ भारस्कर, प्रा. महादेव रोकडे, प्रा. भाग्यवंता माने, प्रा. रूपाली अवचरे उपस्थित होत्या. कार्यक्रमात अखिल मंडई ट्रस्ट व स्वारगेट साईमंदिर यांच्या वतीने थोरवे गुरुजींचा सत्कार करण्यात आला. डॉ. सबनीस म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळात थोरवे गुरुजी यांनी शिक्षण घेऊन मावळ भागातील आढले गावी शाळा सुरू केली. मागासवर्गीय शिक्षकाला त्या काळी कित्येक अपमानित घटनांचा सामना करावा लागला, परंतु शिक्षण ही काळाची गरज ओळखून गुरुजींनी त्यांच्या आयुष्यात घडलेले अनेक विसंवाद आत्मचरित्रात नमूद केले आहेत’’ सूत्रसंचालन प्रा. विजय लोंढे यांनी केले. श्रद्धा चव्हाण-भावे यांनी आभार मानले.
.........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com