वंचित मुलांना घडणार 
मामाच्या गावची सफर

वंचित मुलांना घडणार मामाच्या गावची सफर

पुणे, ता. २ : वंचित आणि विशेष मुलांना मामाचे गाव, आजोळ अनुभवता यावे या हेतूने शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने यंदाही ‘मामाच्या गावची सफर’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत ७ ते ९ मे दरम्यान पुण्यातील विविध स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. यात सुमारे अडीचशे मुलांचा सहभाग असणार आहे. उपक्रमाचे यंदाचे हे २५ वे वर्ष असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते यांनी गुरुवारी (ता. २) पत्रकार परिषदेत दिली.
मुलांच्या स्वागताला बँड, बग्गी, उंट, घोडे, मिकी माऊस असतील. बुधवारी (ता. ८) मुलांना वॉटर पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. गुरुवारी जादूचे प्रयोग, बालनाट्य, चित्रपट दाखविले जातील. तसेच विविध स्पर्धा होणार आहेत. यासह दृष्टिहीन जोडप्यांचे विवाहदेखील यावेळी पार पडणार आहेत. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश सांगळे, रोहन जाधव, वैभव वाघ, आनंद सराफ, अमर लांडे, ॲड. हेमंत झंझाड, विक्रांत मोहिते, तन्मय तोडमल, पंकज पारवे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com