जावयाने पेटविल्या १५ दुचाकी

जावयाने पेटविल्या १५ दुचाकी

पुणे, ता. २ : पत्नीशी भांडण झाल्यामुळे सासरी आलेल्या जावयाने गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातील १५ दुचाकी पेटवून दिल्या. ही घटना सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रूक परिसरात बुधवारी (ता. १) मध्यरात्री घडली.
या प्रकरणी एका महिलेने (रा. वडगाव बुद्रूक) सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गणेश दिनकर दहिभाते (वय ३५) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मुलीचा गणेशसोबत काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्यात वाद झाल्यामुळे पत्नी माहेरी आली होती. १ मे रोजी रात्री गणेश वडगाव बुद्रूकमधील सासरी आला. तेथे त्याचे पत्नीशी भांडण झाले. पत्नीला धडा शिकवण्यासाठी त्याने सासूची दुचाकी जाळली. या वेळी बाजूला असलेल्या इतर दुचाकींनी पेट घेतला. या आगीत १५ दुचाकी जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com