पुण्याचा प्रवास आता ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने

पुण्याचा प्रवास आता ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने

पुण्याचा प्रवास ‘ग्रीन मोबिलिटी’च्या दिशेने

‘सीएनजी’च्या विक्रीत मोठी वाढ; रिक्षा, कॅब चालकांकडून प्रतिसाद

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : पुण्यात रोज सुमारे नऊ लाख मीटर क्यूब ‘सीएनजी’ची विक्री होत आहे. गेल्या काही महिन्यांत यात मोठ्या प्रमाणांत वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत ‘सीएनजी’चे कमी असलेले दर याला प्रामुख्याने कारणीभूत आहे. यामुळे शहरातील रिक्षा चालक, कॅब चालकांकडून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ‘सीएनजी’च्या वापरामुळे हवेचे प्रदूषण कमी होते. ‘सीएनजी’चा वाढता वापर लक्षात घेता पुण्याचा प्रवास आता ‘ग्रीन मोबलिटी’च्या दिशेने होत आहे.
पुण्यात वाढणारा प्रदूषणाचा स्तर लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या भुरेलाल समितीने अहवाल दिला. वाहनातून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहने ‘सीएनजी’वर धावणे आवश्यक आहे. तेव्हा सर्वप्रथम रिक्षांना ‘सीएनजी’ अनिवार्य करण्यात आले. त्यानुसार २००९ पासून पुण्यात ‘सीएनजी’ची सुरुवात झाली. त्यावेळी पुलगेटजवळ एकच पंप होते. आता पुण्यात सुमारे १०५ पंप आहेत. तर वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत ‘सीएनजी’चा वापर करणाऱ्या वाहनाच्या संख्येत १८ टक्क्यांनी तर ‘सीएनजी’ विक्रीत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

१५ वर्षांत १२० पंप
पुण्यात २००९ मध्ये ‘सीएनजी’वर धावणाऱ्या वाहनांचे वितरण सुरू झाले. डिसेंबर २००९ अखेर ‘सीएनजी’वर धावणाऱ्या वाहनांची संख्या ४० हजार होते. त्यावेळी शहरात अवघा एक पंप होता. वाहने वाढत गेली, तशी पंपांची संख्याही वाढत आहे. २०२४ मध्ये ‘सीएनजी’ पंपची संख्या १२० आहे. तर वाहनाची संख्या चार लाख आहे. रोज साधारणपणे पुण्यात नऊ लाख मीटर क्यूब (६ लाख ७० हजार किलो) ‘सीएनजी’ची विक्री होत आहे.

‘सीएनजी’मुळे रिक्षाचालक सुखावले
‘सीएनजी’मुळे रिक्षा चालकांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलले आहे. सामान्यपणे एका रिक्षा चालकांचे दैनंदिन सरासरी उत्पन्न ८०० ते १००० रुपये आहे. त्यांना ‘सीएनजी’वर २५० ते ३०० रुपये खर्च करावा लागतो. जर रिक्षा पेट्रोलवर धावत असेल तर त्यांना दिवसाला ४०० ते ५०० रुपयांचा पेट्रोलवर खर्च करावा लागेल. तसेच ‘सीएनजी’वर धावणाऱ्या रिक्षाला पेट्रोलच्या तुलनेत किमान १० किलोमीटरचे अधिकचे मायलेज मिळते. शिवाय इंजिनचे आयुर्मान देखील तुलनेने अधिक चांगले राहते. त्यामुळे ‘सीएनजी’ रिक्षाचालकांसाठी अत्यंत चांगले ठरली आहे. ‘सीएनजी’मुळे अर्थप्राप्ती चांगली होत असल्याने रिक्षाचालक सुखावले आहेत.

रिक्षाची सीएनजी टाकी क्षमता : ४ किलो
एक किलोमध्ये : ३० किलोमीटरचा प्रवास
सध्याचा सीएनजी दर : ८३.५० रुपये किलो
रोजचा वापर : ५० ते ७० किलोमीटर
रिक्षा चालकांचे सरासरी उत्पन्न : पाचशे ते सातशे रुपये

पुण्याची स्थिती
वाहने : सुमारे २ लाख २५ हजार (कॅब व खासगी वाहने)
रिक्षा : दीड लाख (पुणे व पिंपरी चिंचवड एकत्रित )
रोजची विक्री : ६ लाख ७० हजार किलो

‘पीएमपी’मधील एकूण बस १६५०
सीएनजीवर धावणाऱ्या बस : १२२९
पीएमपी बससाठी वापर : ८४ हजार किलो (दररोज)
सीएनजी पंप : १२०

सतीश गव्हाणे (वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी) ः पीएमपी अल्पावधीतच पूर्णतः ‘सीएनजी’वर शिफ्ट होऊ शकेल. ‘सीएनजी’ची किंमत डिझेलच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे पीएमपीची आर्थिक बचत होत आहे. तसेच प्रदूषणाचीही समस्या काही प्रमाणात कमी होत आहे. ‘सीएनजी’ बसचा देखभाल खर्चही कमी आहे. त्यामुळे आमची पसंती ‘सीएनजी’ बसला अधिक आहे.

१) ‘सीएनजी’च्या वापरामुळे इंधन खर्चात बचत होत आहे. पूर्वी इंधनावर जास्ती खर्च करावा लागे. त्यावेळी घर खर्च होऊन बचत
काही होत नव्हते. आता ‘सीएनजी’ तुलनेने स्वस्त आहे. शिवाय रिक्षाला चांगले मायलेज देखील मिळत आहे. त्यामुळे आता खर्च वगळून चांगली बचत देखील होत आहे.
- राकेश पवार, घोरपडी, रिक्षा चालक

२) डिझेलच्या तुलनेत ‘सीएनजी’ असलेल्या वाहनावर व्यवसाय करणे हे आर्थिकदृष्टया परवडणारे आहे. पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आहे. नेहमीच सिग्नल वा कोंडीत थांबावे लागते. त्यामुळे इंधन अधिक खर्ची पडते. पूर्वी डिझेलचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर होत असे. शिवाय त्याचा आर्थिक फटका देखील बसत होता. आता ‘सीएनजी’मुळे इंधनावरचा खर्च तुलनेने कमी झाला आहे. सहजरित्या उपलब्ध होत असल्याने कोणतेही अडचण जाणवत नाही.
- मनोज कदम, हडपसर, कॅब चालक

३) पीएमपीच्या ताफ्यात सध्या १२२९ बस आहेत. येत्या काही महिन्यात ५०० ‘सीएनजी’वर धावणाऱ्या नवीन बसचा समावेश आहे. इलेक्ट्रिक बसच्या तुलनेत ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसचा वापर करणे अधिक हितावह आहे. ‘सीएनजीवर’ची प्रवासी वाहतूक ही इलेक्ट्रिकच्या तुलनेत स्वस्तात होते. त्याचा फायदा ‘पीएमपी’ला होत आहे.
- सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक,पीएमपीएमएल, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com