उलगडले डॉक्टरांच्या समाधानी वैवाहिक जीवनाचे रहस्य

उलगडले डॉक्टरांच्या समाधानी
वैवाहिक जीवनाचे रहस्य
Published on

पुणे, ता. २६ ः ‘इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए), पुणे आर्ट्स सर्कल’ आणि ‘हर्ट्झ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर मियाँ बीबी राजी तो’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. दिनचर्या अत्यंत व्यस्त असूनही डॉक्टर काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधत आपल्या जोडीदाराबरोबर व्यतीत करीत असलेल्या आनंदी व समाधानी वैवाहिक जीवनाचे रहस्य या कार्यक्रमात उलगडले.
पहिल्या सत्रात आर्ट्स सर्कलच्या सचिव डॉ. गीतांजली शर्मा यांनी ज्येष्ठ डॉक्टर दांपत्यांची मुलाखत घेतली. यामध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. भालचंद्र दीक्षित, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश पानसे, संधिवाततज्ज्ञ डॉ. श्रीकांत वाघ सपत्नीक उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात डॉ. अंजली दीक्षित, डॉ. विजय जठार, डॉ. भक्ती दातार, डॉ. श्रीकांत वाघ, डॉ. किरण आणि डॉ. मीना खरात, डॉ. समीर आणि डॉ.भक्ती दातार, डॉ. मोहन जोशी आणि डॉ. मनीषा देशमुख यांनी गाणी सादर केली.
या वेळी कोलकता येथे झालेल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येचा निषेध करण्यात आला. आयएमए, पुणेचे अध्यक्ष डॉ. राजन संचेती, आर्ट्स सर्कलचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ. अंजली जोशी यांनी दिग्दर्शन आणि आकाश सोळंकी यांनी निवेदन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com