तरुणाला लुटणाऱ्या तिघांना अटक
पुणे, ता. २६ : पिस्तुलाच्या धाकाने तरुणाला धमकावून त्याच्याकडील सोनसाखळी, अंगठी असा ऐवज लुटून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. सुदेश गायकवाड, निखिल कांबळे, अतिब आकील सय्यद (तिघे रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रुद्राक्ष श्याम गलांडे (वय २३, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुद्राक्ष हे शनिवारी (ता. २४) सायंकाळी येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातून जात होते. आरोपी गायकवाड, कांबळे, सय्यद आणि त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी त्यांना हैदराबादी हॉटेलजवळ अडवले. आरोपींनी रुद्राक्षला पिस्तुलासारख्या शस्त्राचा धाक दाखविला. गळ्यातील सोनसाखळी आणि अंगठी असा २५ हजारांचा ऐवज धमकावून काढून घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

