

पुणे, ता. २६ : ‘‘झोपेतील पक्षाघातामागील ६० ते ९० टक्के कारणे पूर्णतः आध्यात्मिक किंवा आध्यात्मिक आणि मानसिक या दोन्ही स्वरूपाची असतात. आध्यात्मिक साधना केल्याने आध्यात्मिक समस्येवर मात करण्यास मदत होते, असे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्यावतीने केलेल्या आध्यात्मिक संशोधनातून दिसून आले आहे,’’ असे मत महर्षी ‘अध्यात्म विश्वविद्यालया’चे शॉन क्लार्क यांनी व्यक्त केले.
बँकॉक, थायलँड येथे नुकत्याच झालेल्या ‘टेंथ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन पब्लिक हेल्थ’ या परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘झोपेतील पक्षाघातावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय’ हा शोधनिबंध सादर केला. याचे लेखक डॉ. जयंत आठवले असून, क्लार्क हे सहलेखक आहेत.
क्लार्क यांनी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्कृती आणि देश यांतील झोपेतील पक्षाघात अनुभवलेल्या ४६ साधकांवर केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष मांडले. हा प्रकार पौर्णिमा, अमावस्या अन् पितृपक्षात सर्वाधिक आढळला. रात्र असो किंवा सूर्यास्ताच्या जवळील दुपारची वेळ असो, गाढ झोपेच्या वेळी याची वारंवारता जास्त होती. विशेषतः तरुणांना झोपेतील पक्षाघात होतो, याचा सरासरी कालावधी तीन मिनिटे ते तीन तास असतो. व्यक्ती तिच्या पाठीवर झोपते तेव्हा या हल्ल्याची शक्यता सर्वाधिक असते, असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
क्लार्क म्हणाले की, झोपेतील पक्षाघातावर मात करण्यासाठी आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी, ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप नियमित करणे, तसेच अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी जप वाढवणे, पूर्व-पश्चिम दिशेला अन् डाव्या कुशीवर झोपणे आणि पाठ किंवा पोटावर झोपणे टाळणे, तसेच प्रतिदिन १५ मिनिटे मिठाच्या पाण्यात पाय बुडवून ठेवणे यांसारखे उपाय प्रभावी आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.