पीआयसीटी महाविद्यालयात इको-फ्रेंडली गणपती कार्यशाळा
पुणे, ता. २७ : पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) या अभियांत्रिकी महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वत्रिक मानवी मूल्य विभागाच्या वतीने करण्यात आले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आणि लहान मुलांना इको-फ्रेंडली गणपती बनविण्याचे तंत्र शिकविण्यात आले. कलाकार भूमेश मसराम यांनी विद्यार्थ्यांना शाडूची माती, नैसर्गिक रंग आणि पर्यावरणस्नेही साहित्याच्या वापराचे महत्त्व पटवून दिले. शिवाजी मुंढे, साक्षी होसमनी, प्रीती जैन, रचना कर्नावट, मकरंद बांडकर यांनी कार्यशाळा आयोजित केली. ‘‘गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. परंतु सण साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे,’’ असे मसराम म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

