खराडीत नदीपात्रात तरुणीचा मृतदेह

खराडीत नदीपात्रात तरुणीचा मृतदेह

Published on

पुणे/वडगाव शेरी, ता. २७ ः खराडीतील मुळा-मुठा नदीपात्रात तरुणीचा मृतदेह आढळला. तरुणीचे शीर आणि हात-पाय धडावेगळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. खून झालेल्या तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही.
खराडी परिसरात एका इमारतीचे काम सुरू आहे. तेथील बांधकाम मजुरांनी सोमवारी (ता. २६) सकाळी नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह वाहून आल्याचे पाहिले. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीची ओळख पटू नये म्हणून शीर धडावेगळे करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असून अहवाल अद्याप मिळालेला नाही. तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० वर्ष असल्याची माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. तरुणीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्यात टाकून देण्यात आला आहे.

अज्ञातावर गुन्हा दाखल
तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू असून याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खून दोन दिवस आधीच झालेला आहे. मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. ओळख पटविण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मिसिंगच्या तक्रारीचा शोध घेतला जात आहे. तसेच पोलिस आरोपीच्या मागावर आहेत.
- हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, झोन चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com