फूड पार्कमध्ये निवासी अन्न प्रक्रिया प्रशिक्षण

फूड पार्कमध्ये निवासी अन्न प्रक्रिया प्रशिक्षण
Published on

अन्न प्रक्रिया उद्योग हे क्षेत्र उत्पादन, खप, रोजगार आणि निर्यात या दृष्टीने मोठे क्षेत्र आहे. उद्योगातील इतर क्षेत्रांपेक्षा नफ्याचे प्रमाणही अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये जास्त आहे. यासंबंधी मार्गदर्शन करणारे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण येत्या शुक्रवारपासून (ता. ३०) सातारा मेगा फूड पार्क येथे आयोजिले आहे. प्रशिक्षणात अन्न प्रक्रिया उद्योगांतील संधी, वाव, आव्हाने व उपाय, विविध उद्योगांची ओळख, सुरुवात कशी व कुठून करावी, आवश्यक उद्योजकता कौशल्ये, स्टार्टअप स्थापना, आवश्यक परवाने, ब्रॅण्डिंग, विक्री व प्रसार, यंत्रसामग्री, निर्यातीतील संधी, शासकीय योजना व अनुदान, कागदपत्रे, अन्नप्रक्रिया उद्योग व्यवस्थापन, बँक कर्ज योजना आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणार्थींना अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी व व्यवसाय व्यवस्थापन विषयी लेखी मार्गदर्शनाबरोबर प्रात्यक्षिक व फळे, लोणचे, मसाला उद्योगांना जवळून पाहण्याची व अभ्यासण्याची संधी उपलब्ध करून देणारे हे प्रशिक्षण असणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

बँकिंग परीक्षा तयारी वर्ग
बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्यांना आजही भरपूर महत्त्व आहे. बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधणाऱ्यांसाठी आयबीपीएस आणि एसबीआय परीक्षांसाठीच्या तीन महिने चालणाऱ्या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन शनिवारपासून (ता. ३१) करण्यात आले आहे. सर्वसमावेशक व नवीनतम परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमानुसार असलेले अभ्यास साहित्य, बँकिंग परीक्षांमध्ये तज्ज्ञ असलेले अनुभवी प्रशिक्षक, नियमित मॉक चाचण्या आणि सराव सत्रे, वेळेचे व्यवस्थापन, प्रभावी अभ्यास तंत्र आणि परीक्षा धोरणांवर वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वैयक्तिक समुपदेशन सत्रे व त्यानुसार वैयक्तिकृत अभ्यास योजना, अभ्यास साहित्य, सराव चाचण्या आणि रेकॉर्ड केलेली व्याख्याने मिळवण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म इत्यादी वैशिष्ट्यांनी युक्त असे हे प्रशिक्षण वर्ग असणार आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आदर्श असे हे प्रशिक्षण असणार आहे.
संपर्क : ९८८१०९९७५७

दुग्ध प्रक्रिया व्यवसाय कार्यशाळा
दूध प्रक्रिया व्यवसाय कसा सुरू करावा, या उद्योगातील संधी, दूध संकलन, साठवण, पारंपरिक आणि नवनवीन दर्जेदार दुग्ध पदार्थ कसे तयार करावे, आवश्‍यक यंत्रसामग्रीची माहिती, प्रकल्प आराखडा, मार्केटिंग, पॅकेजिंग, ब्रॅन्डिंग, अन्न प्रशासन परवाने, बँक फायनान्स आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. ३१) व रविवारी (ता. १) आयोजिली आहे. दुधाचा, दुग्धपदार्थांचा दर्जा उत्तम कसा राखावा, त्यातील भेसळ कशी ओळखावी यासह यशस्वी दूध प्रक्रिया उद्योजकांचे अनुभव ऐकण्याची संधी आहे. पनीर, खवा, पेढा, लस्सी या पदार्थांचे थेट प्रात्यक्षिक पाहता येईल.
संपर्क : ९१४६०३८०३१

बी टू बी व डी टू सी व्यवसायातून उद्योजक होण्याची संधी
अल्प गुंतवणुकीद्वारे फ्रॅन्चायजी मॉडेल घेऊन सरासरी तीन ते पाच लाख रुपये मासिक उत्पन्न मिळवता येणाऱ्या व्यवसाय प्रारूपाची ओळख करून देणारी विनामूल्य कार्यशाळा येत्या रविवारी (ता. १) आयोजिली आहे. कार्यशाळेत प्रिमियम ब्राऊन अंड्यांच्या विक्री व्यवसायाची एजन्सी अथवा फ्रॅन्चायजी कशी मिळेल हे सांगण्यात येईल. युवक, महिला व पुरुष तसेच निवृत्त कर्मचारी यांना कार्यशाळा उपयुक्त आहे. भरपूर मागणी, चांगले मार्जिन, मोनोपॉली प्रॉडक्ट, कमीत कमी गुंतवणूक व घरूनही काम करता येईल असा हा व्यवसाय असणार आहे. एजन्सी व फ्रॅन्चायजी दिल्यानंतर त्यास वन टू वन मार्केटिंग व सेल्स सपोर्ट दिला जाईल.
संपर्क : ७५०७१७२१८१

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com