Pune News: पुणे पोलिसांची सतर्कता! बेपत्ता झालेल्या दहा वर्षांच्या मुलाचा अवघ्या काही तासांत शोध
Pune Crime News: लोहगाव परिसरात राहणारा दहा वर्षांचा मुलगा सोमवारी (ता. २६) दुपारी शाळेतून घरी आला नाही. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी त्वरित लोहगाव पोलिस चौकीत तक्रार दिली
पुणे : शाळा सुटल्यानंतर बेपत्ता झालेल्या दहा वर्षांच्या मुलाचा पोलिसांनी तत्परतेने शोध घेत त्याला पालकांच्या ताब्यात दिले. पालकांनी मुलगा हरविल्याची तक्रार दिल्यानंतर काही तासांत त्याचा शोध घेण्यात आला.