चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेदम मारहाण
पुणे, ता. २७ : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २४ वर्षीय पत्नीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यवान अनिल मोहिते (वय २६, रा. शेळगाव, ता. इंदापूर) असे पतीचे नाव आहे. २४ ऑगस्टला सायंकाळी सातच्या सुमारास तळजाई वसाहत परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती सत्यवान मोहिते याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला बेदम मारहाण केली. यावेळी पत्नी घराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी पतीने पत्नीचा गळा आवळला. यामध्ये ती बेशुद्ध झाली. यानंतर पती घराची कडी बाहेरून लावून पसार झाल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

