कर्वे नगरमध्ये मंगळसूत्र हिसकावले
पुणे, ता. २७ ः मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. कर्वे नगरमधील बाबूराव पडवळ रस्त्यावर हा प्रकार घडला. या प्रकरणी सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय महिलेने अंलकार पोलिस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दुचाकी पार्क करून मार्निंग वॉकसाठी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

