नोकरीच्या आमिषाने ४९ लाखांना फसवणूक
पुणे, ता. २७ ः वानवडीतील लष्करी रुग्णालयात नोकरी लावण्याच्या आमिषाने एका प्रौढाने अनेकांची एकूण ४९ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विनायक तुकाराम कडाळे (वय ५३, रा. गंगाधाम फेज दोन, मार्केटयार्ड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी राजेंद्र काशिनाथ हगवणे (वय ५३, रा. शिवाजी कॉम्प्लेक्स, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हगवणे यांची एका परिचितामार्फत कडाळेशी ओळख झाली होती. ‘लष्करी रुग्णालयात विविध पदांवर भरती होणार आहे. लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझी ओळख आहे. नोकरी लावायची असल्यास सांगा,’ असे त्याने हगवणे यांना सांगितले होते. हगवणे यांची मुलगी आणि नात्यातील इतर काही जणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कडाळेने पैसे मागितले. हगवणे यांनी कडाळेच्या बँक खात्यात ३० लाख ६० हजार रुपये जमा केले. कडाळेने इतरही काही काही जणांकडून एकूण १८ लाख ७५ हजार रुपये घेतले. नोकरी न मिळाल्याने अखेर हगवणे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

