हडपसरमध्ये विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग

हडपसरमध्ये विद्यार्थिनीचा
शिक्षकाकडून विनयभंग
Published on

पुणे, ता. २७ ः शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार हडपसर भागात सोमवारी घडला. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
गणेश काकड असे शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने नववीतील विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला त्रास दिला. या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली. हा प्रकार जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान घडला. मुलगी २६ ऑगस्ट रोजी घरी परतली तेव्हा रडत होती. आईने विचारले असता तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
जुलै महिन्यात काकडने घरचा पत्ता विचारला. तसेच वर्गात शिकविताना मुलीशी असभ्य वर्तन केले. त्यानंतर मुलगी शाळेतून घरी निघाली होती. त्यावेळी काकड शाळेच्या प्रवेशद्वारासमोर थांबला होता. ‘तू घरी चालली आहेस का, मी तुला तुझ्या घरी सोडू का, तू कुठे राहतेस,’ अशी विचारणा त्याने केली.
---
उपप्राचार्यांकडून दखलच नाही
संबंधित विद्यार्थिनीने काकडविरुद्ध उपप्राचार्यांकडे तक्रार दिली, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही, असे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. काकडने मुलीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी मुलगी शाळेच्या मैदानावर होती. त्यावेळी काकड तेथे आला. त्याने पुन्हा असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com