कारवाईच्या धसक्याने अखेर अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला
पुणे, ता. २७ ः महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पदभार बदलण्याचे आदेश देऊन सहा दिवस उलटल्यानंतरही आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी पदभार सोडण्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देताच, संबंधित अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २७) तत्काळ नवीन पदभार स्वीकारला.
आयुक्तांच्या आदेशानंतर आरोग्य विभागात खांदेपालट झाली. प्रत्यक्षात मात्र, काही अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी आदेश देऊन सहा दिवस उलटले, तरीही नवीन पदभार स्वीकारला नव्हता. अगोदरच महापालिकेच्या आरोग्य विभागात काही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडून बसल्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशालाही जुमानले जात नसल्याचा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आला. त्याची गांभीर्याने दखल घेत, आयुक्तांनी नवीन पदभार बदलाचे आदेश दिल्यानंतर पदभार सोडण्याचा प्रश्नच येत नाही, संबंधित अधिकाऱ्याने नवीन पदभार घेतला पाहिजे, असे स्पष्ट करत कारवाईचा इशारा दिला होता. अखेर, आयुक्तांनी कारवाई करण्यापूर्वी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारली. दरम्यान, आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. मनिषा नाईक या सध्या रजेवर आहेत. त्या रजेवर असेपर्यंत त्यांच्याकडील पदभार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांच्याकडे असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

