

आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरींचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मंगळवारी दहिहंडीच्या मुहूर्तावर सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गोविंदांनी पावसाचा मनमुराद आनंद लुटत उत्सव साजरा केला.
पुणे जिल्ह्यात लोणावळा येथे सायंकाळी साडेपाचपर्यंत २८.० मिलिमीटर अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, तर एनडीए ३.०, चिंचवड ११.०, शिवाजीनगर ५.०, हडपसर ०.५, कोरेगाव पार्क १.०, वडगाव शेरी ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात बुधवारी (ता. २८) आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २९) आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.