आकांक्षा फाउंडेशनतर्फे
शनिवार रोजगार मेळावा

आकांक्षा फाउंडेशनतर्फे शनिवार रोजगार मेळावा

Published on

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २७ : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि आकांक्षा फाउंडेशन स्किल स्कूल यांच्या वतीने येत्या शनिवारी (ता. ३१) पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयात सकाळी नऊ वाजता हा उपक्रम सुरु होईल. या मेळाव्याला जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध १०० नामवंत उद्योजक सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडून नऊ हजारांपेक्षा जास्त रिक्तपदांची माहिती कळविण्यात आली आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण, पदवीधर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कोणत्याही शाखेचा अभ्यासक्रम (आयटीआय), पदविकाधारक, शिकाऊ अभियंता (ट्रेनी इंजिनिअर) असे विविध पात्रता निकष आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी विविध संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांनीही सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
स्वयंरोजगाराबाबत माहिती व मार्गदर्शनाकरीता शासनाची विविध कर्ज देणारी महामंडळे, सारथी, बार्टी, अमृत, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांसंबंधी दालने तसेच सीईओपीचे भाऊ इन्स्टिट्यूट, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, द ॲटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), स्मार्ट, मॅग्नेट प्रकल्प, नांदी व देअसरा फाउंडेशन, डॉ. रेड्डीज फाउंडेशन, जन शिक्षण संस्था, लाइट हाऊस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाउंडेशन, एनएसडीसी इंटरनॅशनल अशा शासकीय, खासगी व सेवाभावी संस्थांचे स्टॉलही असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवावेत. रोजगार मेळाव्याच्या दिवशी थेट मुलाखतीस येताना आपली शैक्षणिक कागदपत्रे, पारपत्र आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज, बँक पासबुक, आधारकार्ड आदींच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१ रास्ता पेठ, सरदार मुदलियार रोड, पुणे-११ येथे प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com