

पुणे, ता. ३० ः शुक्रवार पेठेतील खडकमाळ येथे महंमदवाडीतील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या व्हिजन सेंटर (क्रमांक ४१) या उपचार केंद्राचे उद्घाटन रुग्णालयाचे अध्यक्ष राजेश शहा, खडकमाळ गणपती मंडळाचे अध्यक्ष संजय बालगुडे व जिलब्या गणपती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र धावडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या उपचार केंद्रात कमी उत्पन्न गटातील गरजू रुग्णांच्या डोळ्यांच्या तपासण्या माफक दरात केल्या जाणार आहेत. याशिवाय गरजू रुग्णांवर मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रिया विनामूल्य व माफक दरात करण्यात येणार आहेत, असे शहा यांनी यावेळी सांगितले.
एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाची स्थापना २००३ मध्ये झाली. रुग्णालयामार्फत आजपर्यंत सुमारे आठ लाख मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी साडेपाच लाख शस्त्रक्रिया मोफत केल्या असून, डोळ्यांच्या विविध विकारासंबंधीचे संशोधन रुग्णालयाच्या वतीने करण्यात येते. गरजू रुग्णांनी डोळ्यांच्या उपचारांकरिता ९५४६३४२००२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सेंटरतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.