

पुणे, ता. ३० ः श्रावणात खुललेला निसर्ग आणि विविध सणांचा माहौल या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खास ‘सकाळ श्रावण सरी’ हा विशेष कार्यक्रम मंगळवारी (ता. ३) आयोजित करण्यात आला आहे. त्यात केशसौंदर्य, पापडापासून नावीन्यपूर्ण पाककला, टी टाइम आणि मी टाइम, मराठमोळा नऊवारी फॅशनवॉक, श्रावण साज अशा विविध स्पर्धांसोबतच मंगळागौर असा सोहळा होणार आहे. सर्व महिलांसाठी हे कार्यक्रम खुले आहेत.
फॅशन, नावीन्य आणि धमाल यांचा मेळ घालणारा ‘सकाळ श्रावण सरी’ हा सोहळा आहे. परंपरेला स्पर्धेची जोड देणाऱ्या या सोहळ्यात मैत्रिणींनी आकर्षक रंगाच्या पैठणी, काठपदराच्या पारंपारिक साड्या व दागिने परिधान करून नटूनथटून यावे. सकाळ आयोजित श्रावण सरी सोहळ्यास गार्नियर कलर नॅचरल्स हे मुख्य प्रायोजक असून राम बंधू मसाले सहप्रायोजक, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) तर इंडियन ऑइल आणि सोसायटी टी हे असोसिएट प्रायोजक आहेत. केसरीतर्फेही खास बक्षीस आहे. इंडियन ऑईलतर्फे ‘एलपीजी’ची सुरक्षितता या विषयावर प्रश्नोत्तरे असून त्यातील विजेत्यांना खास बक्षिसे मिळणार आहेत. तर, केसरी टूर्सतर्फेही प्रश्नोत्तरे स्पर्धा असून विजेत्यांना टूर्सची पॅकेजेस जिंकण्याची संधी आहे.
महिलांना स्वतःच्या कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, म्हणून तनिष्का नेहमीच कार्यरत असते. ‘श्रावण सरी’ या कार्यक्रमात अधिकाधिक महिलांनी सहभागी होऊन आनंद घ्यावा. विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसांची लयलूट करावी, असे आवाहन तनिष्कातर्फे करण्यात आले आहे.
या शिवाय ‘श्रावणसरी’मध्ये नेक स्पर्धा, लकी ड्रॉ, फ्री गिफ्ट आणि खूप सारी बक्षिसे आहेत. सहभाग घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. चला तर मग खाली दिलेल्या नंबरवर फोन करा आणि आपला सहभाग नोंदवा. सहभागासाठी संपर्क क्रमांक ९८८१५९८८१५
गार्नियर केशसौंदर्य स्पर्धा
केसांना कलर करणं ही आता फक्त गरज नाही तर एक स्टाइल स्टेटमेंट समजली जाते. म्हणूनच सुरक्षित आणि विविध हेअर कलरसाठी गार्नियर कलर हा पर्याय उत्तम आहे. केसाचा रंग, पोत, चमक आणि एकंदर क्वालिटी यांचे परीक्षण करून विजेत्या निवडल्या जातील. सकाळ श्रावण सरी सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मैत्रिणींना ‘गार्नियर’कडून खास गिफ्ट मिळणार आहे.
राम बंधू पापड मसाला पाककला स्पर्धा
पापडापासून नावीन्यपूर्ण शाकाहारी पदार्थ घरून तयार करून कार्यक्रमस्थळी मांडणी करायची आहे. रुचकर, स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थ बनवून, परिक्षकांचे मन जिंकणाऱ्या स्पर्धकांना मिळणार राम बंधू मसालेतर्फे बक्षिस. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड सह अनेक रेकॉर्ड नावावर असलेले प्रसिद्ध शेफ सर्वेश जाधव उपस्थित मैत्रिणींशी संवाद साधत त्यांच्या काही खास पापड रेसिपी ही शेअर करणार आहेत.
सोसायटी चहा-टी टाइम मी टाइम
चहाला अमृततुल्य का म्हणतात? सकाळपासून घडाळ्याच्या काट्यावर कामे उरकणाऱ्या महिलेशिवाय अधिक कोणी सांगू शकणार नाही. चहा सोबतचा हाच आनंद आपल्या आठवणी शब्दातून, फोटो, व्हिडिओ, रिल्समधून आम्हाला पाठवा आणि बक्षिसे जिंका.
उद्योग व्यवसायांची मिळणार माहिती
एमआयडीसी महिला उद्योजिकांना नेहमीच प्रोत्साहित करत असतात. त्यांच्यासाठी आणि महिला बचत गटांसाठी अनेक योजना आहेत. त्यांची माहिती उपस्थित महिलांना येथे मिळणार असून त्यातून व्यवसायाची संधी निर्माण करता येतील.
हे लक्षात ठेवा
- कधी : मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर)
- वेळ : दुपारी १.०० वाजल्यापासून
- कुठे : टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड
- राम बंधू पापड मसाला पाककला स्पर्धा, सोसायटी - टी टाइम मी टाइम स्पर्धा ऑनलाइन डिजिटल पद्धतीनेही आहे. व्हिडिओ, रिल्समधूनही त्यात सहभाग घेता येईल. संपर्क क्रमांक - ९१४६००२२१६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.