बी. यू. भंडारीतर्फे उद्या ‘रन फॉर हर’

बी. यू. भंडारीतर्फे उद्या ‘रन फॉर हर’
Published on

पुणे, ता. ३० ः बी. यू. भंडारीतर्फे ‘इनफ’ अंतर्गत ‘रन फॉर हर’ हा पाच किलोमीटर धावण्याचा उपक्रम रविवारी (ता. १) आयोजित करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हा उपक्रम समाजाला एकत्र आणण्याचा आणि महत्त्वाच्या कारणासाठी पाठिंबा देण्याची संधी आहे. अभय एंटरप्रायझेस, ईगल ऑटोमोटिव्ह सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, निओ ड्राईव्ह, स्ट्रेसलेस मीडिया आणि मार्क ॲण्ड मेक मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांनी या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिला आहे. ‘रन फॉर हर’ उपक्रम बी. यू. भंडारी, पाषाण होणार आहे. त्या माध्यमातून माध्यमातून बी. यू. भंडारी समूह व्यवसायात असूनही सामाजिक जबाबदारीकडे महत्त्वपूर्ण दृष्टिकोनातून पाहतो. समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी हा समूह कायमच सक्रिय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com