क्रीडापटूंना डोपिंगसाठी अवैध औषधविक्री - डोपिंगबाबात औषधे विक्री करणा-यांवर कारवाई करा - कुस्तीमहाविद्या मल्लविद्या महासंघाची कारवाईची मागणी

क्रीडापटूंना डोपिंगसाठी अवैध औषधविक्री


- डोपिंगबाबात औषधे विक्री करणा-यांवर कारवाई करा
- कुस्तीमहाविद्या मल्लविद्या महासंघाची कारवाईची मागणी
Published on

पुणे, ता. १४ : राज्यातील औषधविक्रेते कुस्तीपटुंसह विविध मैदानी खेळ खेळणाऱ्या क्रीडापटूंना नियमबाह्य पद्धतीने कामगिरी उंचावण्यासाठी (डोपिंग) लागणारी औषधे कोणत्याही ‘प्रिस्क्रिप्शन’शिवाय विकत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कुस्तीविद्या मल्ल महासंघाने केला आहे. अशा औषधविक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी अन्न-व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) करण्यात आली आहे.
महासंघाने ‘एफडीए’ला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘ही विक्री ऑफलाईन तसेच ऑनलाइन पद्धतीने होते. शारीरिक क्षमता जलद गतीने वाढावी म्हणून क्रीडापटू उत्तेजक पदार्थ, मादक द्रव्ये असलेल्या औषधांचे सेवन करतात. सध्या राज्यातील कुस्तीपटू, कबड्डीपटू, शरीरसौष्ठवपटू आणि मैदानी खेळांतील क्रीडापटूंमध्ये हे प्रमाण जास्त आहे. अनेक क्रीडापटू ‘डोपिंग’च्या आहारी जाताना दिसते. अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीमुळे असे क्रीडापटू डोपिंग करतात. खेळातील प्रगतीच्या जोरावर प्रसिद्धी तसेच खेळाडू कोट्यातून नोकरी मिळावी म्हणून ते अशा मार्गांचा अवलंब करतात, मात्र यामुळे त्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते.’
-----------
हृदयविकारावरील तसेच उत्तेजक औषधे डॉक्टरांच्या लेखी ‘प्रिस्क्रिप्शन’शिवाय औषधविक्रेत्यांकडून खेळाडूंना उपलब्ध कसे होतात? काही डॉक्टर व औषधविक्रेते खेळाडूंना चुकीची माहिती देऊन जास्त दर आकारून खेळाडूंना अशा औषधांची विक्री करतात. काही ‘सप्लिमेंट’ विक्रेते, वितरक याची विनापरवाना विक्री करतात. अवैधपणे औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांचा परवाना रद्द करून क्रीडा क्षेत्राची वाढत्या ‘डोपिंग’पासून सुटका करावी अशी ‘एफडीए’ला विनंती आहे.
- निकुंज उभे, महाराष्ट्र राज्य कुस्तीविद्या मल्ल महासंघ
---------
आमचे सभासद ‘एफडीए’च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. तसेच ‘प्रिस्क्रीप्शन’शिवाय औषधे न विकण्याच्या सूचना संघटनेने दिलेल्या आहेत. गैरकृत्य करणाऱ्या औषधविक्रेत्याला संघटना पाठीशी घालत नाही. अशी औषधे ऑनलाइन माध्यमातून सहज उपलब्ध होत असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत.
- संदीप पारख, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com