पेठांमध्ये चेंबरभोवतीची खड्डे दुरुस्ती वेगात

पेठांमध्ये चेंबरभोवतीची 
खड्डे दुरुस्ती वेगात
Published on

पुणे, ता. ८ ः पुण्याच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरील चेंबरभोवती निर्माण झालेले खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेकडून वेगात केले जात आहे, मात्र उपनगरांमधील चेंबरभोवतीचे खड्डे दुरुस्तीचे काम अद्यापही संथगतीनेच सुरू आहे.
पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. महापालिकेच्या पथ विभागामार्फत रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार, शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडीपासून नागरिकांची काहीशी सुटका झाली. दरम्यान, शहरातील बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील चेंबरभोवती खड्डे निर्माण झाले होते. पथ विभागाच्या देखभाल दुरुस्ती वाहनाद्वारे संबंधित खड्डे दुरुस्ती करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे पेठांच्या परिसरातील रस्त्यांवरील चेंबरभोवतीचे खड्डे काही प्रमाणात कमी झाल्याची सद्यःस्थिती आहे.
शहरातील हडपसर, येरवडा, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, वानवडी, मुंढवा, बोपोडी, औंध, कोथरूड, वारजे, कर्वेनगर, वडगाव, कात्रज, धनकवडी, मार्केट यार्ड, बिबवेवाडी या परिसरात तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील खड्ड्यांची समस्या कायम आहे. याबरोबरच तेथेही रस्त्यांवरील चेंबरभोवती खड्डे तयार झाले आहेत. चेंबरभोवतीच्या खड्ड्यांत दुचाकीचे चाक गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्‍यता आहे. पथ विभागाकडून उपनगरांमध्येही खड्डे दुरुस्तीचे काम सुरू आहे, मात्र हे संथगतीने काम सुरू आहे. या कामाला अधिक गती मिळाल्यास नागरिकांना होणारा त्रास कमी होण्याची शक्‍यता आहे.

पथ विभागाकडून उपनगरांमध्ये प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे भाग देण्यात आले आहेत, त्यांच्याकडून खड्डे दुरुस्तीची कामे बहुतांश ठिकाणी सुरू आहेत. अनेक ठिकाणी पॅचवर्कची कामेही पूर्ण झाली आहेत.
-अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, महापालिका.


रस्त्यांवरील चेंबरभोवतीच्या खड्ड्यात दुचाकीचे चाक गेल्यास वाहन जोरात आदळते. त्यामुळे कंबरेला, मानेला झटका बसतो. अशा घटनांमधून गंभीर अपघातही होऊ शकतो. त्यामुळे खड्डे दुरुस्तीची कामे तातडीने केली पाहिजेत.
-किरण भावसार, नोकरदार, वारजे माळवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com