Pune Rain News
Pune Rain Newssakal

Pune Rain News : ‘आपत्ती’ व्यवस्थापनाचा आदेश;पण सुट्टीमुळे कार्यवाहीच नाही

शहरात मुसळधार पावसामुळे पाणी तुंबल्यानंतर तातडीने मदतकार्य करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने शुक्रवारीच (ता. ७) आदेश काढला होता. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने ७५ जणांचे पथक तयार करावे असा आदेश होता, मात्र शनिवारी महापालिकेला सुट्टी असल्याने त्यावर कार्यवाहीच झाली नाही.

पुणे : शहरात मुसळधार पावसामुळे पाणी तुंबल्यानंतर तातडीने मदतकार्य करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने शुक्रवारीच (ता. ७) आदेश काढला होता. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने ७५ जणांचे पथक तयार करावे असा आदेश होता, मात्र शनिवारी महापालिकेला सुट्टी असल्याने त्यावर कार्यवाहीच झाली नाही. ही पथके आता सोमवारनंतर तयार केली जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.

शहरात पाणी तुंबत असल्याने त्याचा निचरा होण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी असा आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला होता. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी (ता. ७) आदेश काढला. यात वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मुकादम, कोठी निहाय आरोग्य सेवक, कनिष्ठ अभियंता यांची नेमणूक करावी, प्रत्येक सत्रासाठी २५ या प्रमाणे तीन सत्रांसाठी ७५ जणांची नेमणूक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने करावी, तुंबलेले ड्रेनेज साफ करणे, चेंबरच्या झाकणांमधील कचरा काढणे, पाणी तुंबण्याची नवी ठिकाणे तयार झाल्यास त्याची नोंद घेऊन तेथे तातडीने मदत पोचविणे अशी कामे या पथकांनी करावीत, १ जून ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ही पथके कार्यान्वित असतील, असे उपायुक्त महेश पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे. हा आदेश निघण्यापूर्वी आयुक्तांनी तोंडी आदेश देऊन पथक तयार करण्यास सांगितले होते, पण क्षेत्रीय कार्यालयांनी अशा पद्धतीने पथके तयार केली नाहीत.


उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे प्रयत्न
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त महेश पाटील यांनी सांगितले की, शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दणादण उडाल्यानंतर उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरु केले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झाडपडीच्या २२, तर पाणी तुंबल्याच्या ३२ तक्रारी दूरध्वनीवरून आल्या. त्यानुसार संबंधित ठिकाणी त्वरित मदत कार्य सुरु केले. ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबले होते, तेथे पाणी निचरा करण्यासाठी काम सुरु केले आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात पथक स्थापन करण्यास आयुक्तांनी बैठकीत आदेश दिले होते.

सिंहगड रस्त्यावर माणिकबागेत रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी होते. सुमारे २५ दुकानांमध्ये पाणी शिरले. मदतीसाठी फोन केला असता आधी केवळ दोन बिगारी पाठविण्यात आले. परत फोन केल्या नंतर चार-पाच जण आले. या ठिकाणी पाण्याला वाट करून देण्यासाठी जेसीबी मागविला तर सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाचा जेसीबी चालक सुट्टीवर आहे असे कळले. त्यामुळे धनकवडी येथून जेसीबी पाठव असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन तास उलटूनही कोणतीही मदत मिळाली नाही. अखेर पाऊस कमी झाल्याने तुंबलेले पाणी कमी झाले. आपत्ती व्यवस्थापन पथक केवळ नावापुरतेच असून, संकटाच्या वेळी नागरिकांना मदत मिळाली तरच त्याला अर्थ असेल.
- दीपक नागपुरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com