जेईई ॲडव्हान्समधून ४८ हजार विद्यार्थी पात्र

जेईई ॲडव्हान्समधून ४८ हजार विद्यार्थी पात्र

पुणे, ता. ९ : देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) विविध अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. जवळपास एक लाख ८० हजार २०० विद्यार्थ्यांनी पेपर एक आणि पेपर दोन दिले. त्यातील ४८ हजार २४८ विद्यार्थी पात्र ठरले असून त्यात सात हजार ९६४ विद्यार्थिनी आहेत.
या परीक्षेत आयआयटी दिल्ली झोनमधील वेद लाहोटी हा ३६० पैकी ३५५ गुण मिळवीत देशात पहिला आला आहे. तर आयआयटी मुंबई झोनमधील द्विजा पटेल ही ३३२ गुण मिळवून विद्यार्थिनींमध्ये पहिली आली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास यांच्या वतीने यंदा जेईई ॲडव्हान्स परीक्षा २६ मे रोजी घेण्यात आली. या परीक्षेसाठी एक लाख ८६ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील एक लाख ८० हजार २०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

दहा जणांना पहिली रॅंक
वेद लाहोटी, राघव शर्मा, मॅच बालादित्या, बिबस्वान बिस्वास, सुमुख एम जी, चुंचिकला श्रीचरण, गुंडा जोष्मिथा, पार्थ बावनकुळे, हेमंत गोडवे या दहा विद्यार्थ्यांना विविध प्रवर्गातून पहिली रॅंक मिळाली आहे.

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेतील आकडेवारी
परीक्षार्थी : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले (दोन्ही पेपर) : पात्र ठरलेले
विद्यार्थी : १,४३,६३७ : १,३९,१८० : ४०,२८४
विद्यार्थिनी : ४२,९४७ : ४१,०२० : ७,९६४
एकूण : १,८६,५८४ : १,८०,२०० : ४८,२४८

‘आयआयटी’तील अभ्यासक्रमांना मिळतो प्रवेश
अभ्यासक्रम : कालावधी
बी.टेक (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी) : ४ वर्ष
बी.एस (बॅचलर ऑफ सायन्स) : ४ वर्ष
बी. आर्च (बॅचलर ऑफ आर्किटेक्चर) : ५ वर्ष
दुहेरी पदवी बी.टेक-एम.टेक : ५ वर्ष
दुहेरी पदवी बी.एस-एम.एस : ५ वर्ष
इंटिग्रेटेड एम. टेक : ५ वर्ष
इंटिग्रेटेड एम. एस्सी : ५ वर्ष

रॅंकनुसार प्रवेश देणाऱ्या अन्य संस्था
भारतीय विज्ञान संस्था (बंगळूर), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (तिरूअनंतपुरम), राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी (रायबरेली), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी (विशाखापट्टणम)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com