मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

पुणे, ता. ९ : विद्यार्थ्यांसह नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी आणि शेतकऱ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रवेश सूचना जाहीर करण्यात आली आहे. सामाजिकशास्त्रे, वाणिज्य व व्यवस्थापन, कला, विज्ञान, आरोग्य विज्ञान, शिक्षणशास्त्र, कृषी विज्ञान आणि निरंतर शिक्षण विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलैपर्यंत आहे.
मुक्त विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव दिलीप भरड यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. नेहमीच्या पदवीबरोबरच विद्यार्थी दूरशिक्षणाद्वारे अधिकची पदवी मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. त्याचबरोबर अपरिहार्य कारणामुळे शैक्षणिक प्रवाहापासून दूर गेलेल्यांनाही यामुळे शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होते. मुक्त विद्यापीठाच्या वतीने पदवी अभ्यासक्रमांबरोबरच प्रमाणपत्र, पदविका आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही घोषित करण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशअर्ज दाखल करावेत, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे. जवळच्या महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र असून, त्याला भेट दिल्यास अधिकची माहिती मिळेल.

निवडक वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम
१) संगणकशास्त्र विद्याशाखा
अ) प्रमाणपत्र : ॲडव्हान्स एक्सेल, ॲडव्हान्स कॉम्प्युटराइज्ड फायनान्शियल अकाउंटिंग, डेटा अनॅलिटिक्स
ब) पदविका : कंप्युटेशनल फायनान्शियल अकाउंटिंग
क) पदवी : बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बीएस्सी (कॉम्प्युटर सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन), बी.बी.ए.

२) निरंतर शिक्षण विद्याशाखा
अ) प्रमाणपत्र : जर्मन, फ्रेंच, डिजिटल फोटोग्राफी
ब) पदविका : ड्रोन सिस्टम इंडस्ट्री प्रोग्रॉम, डीजीसीए सर्टिफाइड ड्रोन पायलट, ॲडव्हान्स डिप्लोमा इन शिपींग ॲण्ड लॉजिस्टिक्स
क) पदवी : बीएस्सी (मीडिया ग्राफिक्स ॲण्ड ॲनिमेशन), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी)

अधिक माहितीसाठी : https://ycmou.digitaluniversity.ac/

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com