टँकरच्या धडकेत
मुलाचा मृत्यू

टँकरच्या धडकेत मुलाचा मृत्यू

पुणे, ता. ९ : टँकरच्या धडकेत १० वर्षांच्या सायकलस्वार मुलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ७) लोहगाव परिसरात हा अपघात झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोहम सुनील देडे (रा. उबाळेनगर, लोहगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत सोहम याचा मामा दशरथ राजू जाधव (वय २६) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांचा भाचा सोहम देडे आणि त्याचा भाचा शिवम (वय आठ) रात्री आठच्या सुमारास खांदवेनगर परिसरात सायकल खेळत होते. त्यावेळी भरधाव टँकरने सोहमला धडक दिली. अपघातानंतर टँकरचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या सोहमचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com