प्रदूषणावरील उपाययोजना 
प्रदर्शनाचे उद्‍घाटन

प्रदूषणावरील उपाययोजना प्रदर्शनाचे उद्‍घाटन

पुणे, ता. ९ ः ग्रीन हिल्स समूहातर्फे प्रदूषणावरील उपाययोजनेवर आधारित दोन दिवसीय पर्यावरण प्रदर्शनाचे उद्‍घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आणि माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन सोमवारपर्यंत (ता. १०) सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत बालगंधर्व कलादालन येथे सर्वांसाठी खुले असणार आहे.
याप्रसंगी पालिकेच्या पाणी विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, ‘नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज, पुणे’च्या अध्यक्षा श्यामला देसाई, ग्रीन हिल्स ग्रुपचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी, रूट स्किल संस्थेच्या संस्थापिका भविष्या बुद्धदेव, चित्रकार अतुल वाघ आदी उपस्थित होते.
प्रदर्शनात गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे जल संवाद, लाइफ ट्री, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज, वन उद्यान संवर्धन व सेवा, जिवीत नदी, डू सेव्ह, रूट स्किल्स, पीएमसी आणि अतुल आर्ट्स आदी संस्था सहभागी झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com