विमानाने जायचेय? साडेतीन तास आधीच घरातून निघा

विमानाने जायचेय? साडेतीन तास आधीच घरातून निघा

पुणे, ता. ९ ः पुणे विमानतळाच्या परिसरात पावसानंतर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवाशांनी किमान साडेतीन आधीच घरातून निघावे, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे. विमान कंपन्यांनीही हेच आवाहन केले आहे.
विमानतळ परिसरात गेल्या काही दिवसांत मोठा पाऊस झाला. त्यामुळे येरवडा, धानोरी, लोहगाव, वडगाव शेरी आदी परिसरातील सखल भागात मोठया प्रमाणात पाणी साचले. परिणामी विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अनेक प्रवाशांना विमानतळावर वेळेत पोहोचता आले नाही. अलीकडेच तब्बल ४०० प्रवाशांना विमानतळावर विमानाच्या वेळेत पोहोचता आले नाहीत. त्यामुळे त्यादिवशी ते इच्छित स्थळी जाऊ शकले नाहीत.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना विमानाच्या वेळेआधी दोन तास विमानतळावर दाखल होण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. सध्या पुण्यातील वाहतूक स्थिती लक्षात घेता प्रवाशांना हे आवाहन करण्यात आले.
---
पावसामुळे हे होते
१) कुणी धावत-पळत विमानतळ गाठते
२) कुणी मोटारीतून उतरून दुचाकीवर बसून विमानतळ गाठते
३) अनेक प्रवासी ऐनवेळी दाखल होत असल्याने टर्मिनलवर गर्दी
४) चेक-इन, सिक्युरिटी चेक, बोर्डिंग गेटवर प्रवाशांची गर्दी
---

सोमवारी (ता. १०) पुण्यात मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर लवकर दाखल व्हावे. त्यासाठी घरातून किमान साडेतीन तास आधी निघावे.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ
------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com