कृष्णकुमार गोयल यांना 
व्यापार भूषण पुरस्कार

कृष्णकुमार गोयल यांना व्यापार भूषण पुरस्कार

पुणे ता. १० : स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चेंटस् असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट दुकान, उत्कृष्ट विक्रेता, फिनिक्स पुरस्कार, उत्कृष्ट महिला व्यापारी आणि डॉ. धनंजय व साधना गोरे स्मृती पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी किशोर पिरगळ, मोहन कुडचे, सूर्यकांत पाठक, मदनसिंह राजपूत, सुरेश नेऊरगावकर, नितीन पंडित आदी उपस्थित होते. पुरस्कार प्रदान समारंभ नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सोमवारी (ता. १७) सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com