‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र परीक्षा २९ जून रोजी

‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र परीक्षा २९ जून रोजी

सर्व रिअल इस्टेट एजंटना अनिवार्य झालेले ‘महारेरा सक्षमता प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठीची परीक्षा येत्या २९ जून रोजी होणार आहे. ज्यांनी १४ एप्रिलपर्यंत परीक्षेसाठी अर्ज केले आहेत त्यांना ही परीक्षा देता येणार आहे. नुकतेच ‘महारेरा’ने प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटावर धडक कारवाई करत तब्बल २० हजार एजंटची नोंदणी निलंबित केली आहे. ‘महारेरा’ने आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले असून यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच १७ जून सुरु होत आहे.
संपर्क : ७६२०१०३१३६

औषधी वनस्पती लागवड व प्रक्रिया उद्योग
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षांत औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धती व त्यांच्या प्रक्रिया उद्योगाविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा येत्या रविवारी (ता. १६) आयोजित केली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रात्यक्षिक अनुभवासाठी थेट औषधी वनस्पतींच्या उद्यानात जाऊन वनस्पतींविषयी माहिती करून दिली जाणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२

जाणून घ्या बेकरी उत्पादने प्रक्रिया, व्यवसाय संधी
वाढत्या मागणीमुळे बेकरी उत्पादनांना चांगली बाजारपेठ आहे. भरपूर संधी असणाऱ्या या व्यवसायाबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवारी (ता. १५) व रविवारी (ता. १६) आयोजित केले आहे. प्रशिक्षणात बेकरीमध्ये तयार केली जाणारी टोस्ट, पाव, बन, केक, बिस्कीट तसेच केक व बिस्कीटची सजावट इ. उत्पादने, नवीन बेकरी उद्योग सुरू करण्याचे तंत्र व त्याचे व्यवस्थापन, मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याचे तंत्र, त्यासाठी लागणारी यंत्रे, पायाभूत सुविधा, प्रोजेक्ट प्लॅनिंग, पॅकेजिंग, लेबलिंगविषयी मार्गदर्शन होणार आहे. या लघु उद्योगासाठी अंदाजे गुंतवणूकविषयी टर्नकी प्रोजेक्ट सल्लागार मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय बेकरी प्रॉडक्ट्सचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहता येण्यासाठी बेकरी इंडस्ट्रीला फिल्ड व्हिजिटचे नियोजन आहे. उद्योजक, नवउद्योजक, व्यावसायिक, विद्यार्थी, गृहीणींसाठी प्रशिक्षण फायदेशीर आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१


‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण वर्ग
‘एफपीसी’ची नोंदणी पूर्ण होताच या कंपनीला सीईओ (किंवा व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. भारतामध्ये आजघडीला ४० हजारांहून अधिक ‘एफपीसीं’ची नोंदणी झालेली आहे. खुल्या बाजारात नवनव्या व्यवसाय संधी वाढू लागल्याने शेतकरीही ‘एफपीसी’ संकल्पनेच्या माध्यमातून बाजारात आपली उत्पादने आणण्याचा कल वाढत आहे. या पार्श्वभूमीवर २० जूनपासून पाच दिवसांचे ‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण आयोजित केले आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, करप्रणाली, व्यवसाय आराखडा स्वरूप, बुक किपिंगचे महत्त्व, शासकीय योजनांची ओळख या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषीसह इतर शाखेतील पदवीधर, ‘एफपीसी’ संचालक तसेच ‘एफपीसी’ नोंदणी करू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
संपर्क : ९३०७६४९०४७

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com