‘एनएसक्यूएफ’ अभ्यासक्रम पुढील वर्षापासून सुरु होणार

‘एनएसक्यूएफ’ अभ्यासक्रम
पुढील वर्षापासून सुरु होणार

पुणे, ता. १० ः राज्यात सध्या सुरू असलेले द्विलक्षी अभ्यासक्रम यंदाच्या वर्षासाठी राबविता येतील. पुढील म्हणजे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून मात्र महाविद्यालयांना ‘नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’ (एनएसक्यूएफ) रूपांतरित नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावे लागतील.
‘एनएसक्यूएफ’चे अभ्यासक्रम यंदापासून राबविण्यास स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे. युवकांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने रोजगार तसेच स्वयंरोजगार मिळविण्यास प्रवृत्त करून महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळणारा लोंढा थांबवा या उद्देशाने व्यावसायिक विषयांची ३० टक्के व्याप्ती असलेले द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. सध्या तांत्रिक, वाणिज्य, कृषी, मत्स्य या गटांतील सुमारे १६ द्विलक्षी अभ्यासक्रम राबविले जात आहेत. मात्र गेल्या वर्षी २० जून रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून हे अभ्यासक्रम ‘एनएसक्यूएफ’शी सुसंगत करण्यात आले.
मत्स्य गटातील फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी व फ्रेश वॉटर फिश कल्चर हे व्यवसाय अभ्यासक्रम तसेच तांत्रिक गटातील केमिकल प्लांट ऑपरेटर हे अभ्यासक्रम भोपाळच्या पीएसएससीआयव्हीई या संस्थेने विकसित केलेले नाहीत. त्यामुळे ते बंद करण्यात आले आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार रूपांतरित व्दिलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रम २०२४-२५ ऐवजी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com