विद्यापीठात औषधी वनस्पतींची लागवड

विद्यापीठात औषधी वनस्पतींची लागवड

पुणे, ता. ११ ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील औषधी वनस्पती उद्यानात दुर्मिळ वनस्पतींची लागवड करण्यात आली.
राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, वनस्पतिशास्त्र विभाग आणि पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह- सुविधा केंद्र यांच्यामार्फत औषधी वृक्षांचे रोपण, औषधी वनस्पती रोपे वाटप, विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन, अश्वगंधा रोपे वाटप, शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड आदी उपक्रम घेण्यात आले.
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते कडूकवठ, अंकोल, काकड, काजरा, धावडा, रोहितक, जमालगोटा, रिठा, नोनी, जंगली जांभूळ, फणस, लक्ष्मीतरु, मोह, टेटू, बकुळ, शमी अशा दुर्मिळ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर आदी उपस्थित होते.
केंद्राचे विभागीय संचालक प्रा. दिगंबर मोकाट यांनी प्रास्ताविक केले. वनस्पतीशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. प्रा. ए. बी. नदाफ यांनी मार्गदर्शन केले. कुलगुरूंच्या हस्ते ‘एक वृक्ष निरोगी आरोग्यासाठी, संपन्न देशासाठी, शाश्वत विकासासाठी’ या उपक्रमाचे उद््घाटन करण्यात आले. नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन, शाश्वत विकास, कार्बन क्रेडिट व पर्यावरणासाठीचे कायदे या विषयांवर सुविधा केंद्रात तज्ज्ञांनी चर्चा केली.
प्रा. अविनाश आडे यांनी वनस्पतींच्या पर्यावरणशास्त्राविषयी माहिती दिली. प्रा. बालाप्रसाद अंकमवार यांनी नैसर्गिक स्रोतांचा शाश्वत वापर, डॉ. ज्योती भाकरे यांनी पर्यावरण विषयक विविध कायदे, डॉ. आदिनाथ फुंदे यांनी ऊर्जा बचत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत या विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. डी. जी. नाईक यांनी वातावरणातील बदलामुळे होणारे प्रदूषण व नियंत्रणासाठीचे उपाय आणि डॉ. श्रीपाद महामुनी यांनी ‘आयुर्वेद आणि सध्याच्या आरोग्याच्या समस्या’ या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. ताई खरात यांनी उपस्थितांना रोपे देऊन आभार मानले.
-------
वृक्षांचे वाटप
मंचरच्या अमृत फूड्स व हर्ब्स यांच्या सहयोगाने मेंगडेवाडी ग्रामपंचायतीला (ता. आंबेगाव) बेलाच्या १०० रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच बाळासाहेब मेंगडे उपस्थित होते. प्रकल्प सहाय्यक गणेश शेकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी बांधावर बेलाचे रोपण केले. अश्वगंधा मोहिमे अंतर्गत आयुर्वेद रसशाळा येथे अश्वगंधा या औषधी वनस्पतीची १००० व औषधी वृक्षांची ७५ रोपे वाटण्यात आली. आयुर्वेद रसशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय डोईफोडे, सचिव डॉ. राजेंद्र उपरीकर यांनी औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व विशद केले.
--------

फोटो ः 25319
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com