आतेभावाचा खून करणारा गजाआड

आतेभावाचा खून करणारा गजाआड

पुणे, ता. ११ : पिण्यासाठी पाणी मागितल्याने झालेल्या किरकोळ वादातून एकाने आतेभावाच्या डोक्यात वीट, तसेच सिमेंटचा गट्टू मारून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंढव्यातील कामगार मैदानाजवळ घडली होती. खून करणाऱ्या नातेवार्इकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीकांत निवृत्ती आल्हाट (वय ४२, रा. मुंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राकेश तुकाराम गायकवाड (वय ३५, रा. आनंद निवास, कामगार मैदान जवळ, मुंढवा) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत संतोष आल्हाट (वय ४६, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत आल्हाट हे राकेश गायकवाड याचे आतेभाऊ आहे. ते दोघेही शेजारी राहात. श्रीकांत हे उदरनिर्वाहासाठी मजुरी करतात. शनिवारी (ता. ८) रात्री ते उशिरा पिण्याचे पाणी मागण्यासाठी राकेशकडे गेले. त्यावेळी राकेशने पाणी दिले नाही. त्यामुळे श्रीकांत यांनी त्याला शिवीगाळ केली. राग आल्याने राकेश याने श्रीकांत यांच्या डोक्यात वीट, तसेच सिमेंटचा गट्टू मारला. यामध्ये श्रीकांत यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून करून पसार झालेल्या राकेशला पोलिसांनी अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com