मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारला राज्यमंत्रिपदाचा कार्यभार

मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारला राज्यमंत्रिपदाचा कार्यभार

पुणे, ता. ११ : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज (ता. ११) सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. मंत्रालयाचे केंद्रीय सचिव डॅा. आशिष कुमार भूटानी यांनी मोहोळ यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यापूर्वी मोहोळ यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले.
सहकार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यावर काम कशा पद्धतीने चालते, राज्यमंत्र्यांची जबाबदारी काय असते, निर्णय कसे होतात, देशभरातील महत्त्वाच्या संस्थांबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांकडून मोहोळ यांनी माहिती घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार खात्याचे काम करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील सहकार चळवळीला बळ देणे, सहकार क्षेत्राबद्दल सामान्य नागरिकांमध्ये विश्‍वासार्हता निर्माण करण्याचे काम प्राधान्याने करणार आहे. सहकार मंत्रालय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. सहकाराची पाळेमुळे देशाच्या ग्रामीण भागात पसरली असून, या मंत्रालयामार्फत ग्रामीण जनतेसाठी काम करता येईल, याचे मोठे समाधान आहे.

शहांकडून कौतुकाची थाप
मोहोळ यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी शाह यांनी मोहोळ यांच्या पाठीवर थाप टाकत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com