नेतृत्वासाठी सर्वात आधी पुढाकार घ्यायला शिका

नेतृत्वासाठी सर्वात आधी पुढाकार घ्यायला शिका

पुणे, ता. ११ ः वारसा परंपरेतून जगातील एकही नेतृत्व विकसित झालेले नाही, तर सामन्यांतून असामान्य झालेल्या व्यक्तींनी समाजाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे नेतृत्वासाठी सर्वात आधी पुढाकार घ्यायला शिका, असा सल्ला प्रेरणादायी वक्ते आणि लेखक नितीन बानगुडे पाटील यांनी दिला.
पुढाकार घेण्यासाठी लढावे लागेल, संघर्ष करावा लागेल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले, ‘‘सध्या समाजात चांगले असावे आणि चांगले दिसावे असे दोन प्रवाह आहेत. त्यामुळे आपला प्रवाह नक्की कोणता हे ठरवायला हवे. राजकारण हे तत्त्वांचे, मूल्यांचे आणि नैतिकतेचे असायला हवे. दुर्दैवाने आज तो आकड्यांचा खेळ झाला आहे. अनुकूल परिस्थितीत सर्वच प्रेरणा देतात. आपण मात्र प्रतिकूल परिस्थितीत लोकांना प्रेरणा देण्याचे काम करायला हवे.’’
नेतृत्व विकासासाठी आवश्यक गुणांच्या संदर्भात बानगुडे पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
----
बानगुडे पाटील यांचे बोल
- समाजाभिमुख नेतृत्वासाठी वैयक्तीक चारित्र्य शुद्ध हवे
- तुमच्याकडे संवेदनशीलता असावी
- ज्यांना ध्येय नाही, ती माणसे भरकटतात
- साधनेसाठी कष्ट, समर्पण, त्याग आणि संयम गरजेचा
- स्वतःच्या क्षमता, कौशल्य, बलस्थाने आणि कमकुवत बाजूंचा अभ्यास करा
- आत्मविश्वास अभ्यासाने प्राप्त होतो
- जग जिंकायची घाई करू नका
- जीवनात वाटचाल करताना आधी माणसे जोडा
- स्वतः घेतलेला निर्णय स्वतःला योग्य ठरवता आलाच पाहिजे
- यशासाठी सातत्याचा चिकाटीने पाठलाग करा
- शिस्त हा यशापर्यंत पोचणारा सर्वोत्तम मार्ग
---------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com