‘पाटबंधारे’च्या जागेतील होर्डिंगवर कारवाई करा : अनंत घरत

‘पाटबंधारे’च्या जागेतील होर्डिंगवर कारवाई करा : अनंत घरत

पुणे, ता. ११ : पुणे महापालिकेच्या हद्दीतील नियमबाह्य होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले असले, तरी हा केवळ दिखावा आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाच्या जागेत अनधिकृत होर्डिंग उभे असूनही महापालिका त्यावर कारवाई करत नाही. महापालिकेने कारवाई करावी; अन्यथा आंदोलन केले जाईल, अशा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांनी दिला आहे.
मुंबई -पुण्यासारख्या शहरांमध्ये जाहिरातींसाठी मोठमोठे होर्डिंग उभारले जात आहेत. दुर्घटना घडल्यावर ते अनधिकृत होते, कायद्याचे पालन केले नाही, म्हणून कारवाई होते. पण सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पाटबंधारे विभागाच्या जागेत होर्डिंग उभे असले, तरी आकाशचिन्ह विभाग जागा होत नाही. खडकवासला पाटबंधारे विभागाने १८ सप्टेंबर २०१८ ला महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले होते. त्यात अनधिकृत होर्डिंग व्यावसायिकांची नावे पाठवून त्यांचा परवाना नूतनीकरण करू नये असे कळविले होते. पण त्यानंतरही महापालिका होर्डिंगवर कारवाई करत नाही, असे घरत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com