आयुक्‍तांकडून झाडाझडती, आज बैठक

आयुक्‍तांकडून झाडाझडती, आज बैठक

महापालिका आयुक्त घेणार अधिकाऱ्यांची बैठक
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाल्यांवरील अतिक्रमण, नाले वळवून प्रवाहाला अडथळा निर्माण करणे, नाल्यांची स्वच्छता न करणे, पावसाळी वाहिन्यांची सफाई न करणे आदी कारणांमुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली. गेल्या तीन-चार दिवसांत आयुक्तांकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळांनी लेखी निवेदने देत त्रुटी समोर आणल्या आहेत. तर प्रशासनाकडून सर्व काही योग्य पद्धतीने कामे झाल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर उद्या (ता. १२) महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले हे अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

केबल टाकल्याने पोलिसांकडे तक्रार
पावसाळी वाहिन्यांमध्ये केबल टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पावसाळी वाहिन्यांमधून पाणी वाहून न जाता सिंहगड रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी तुंबले. महापालिकेने आज सिंहगड रस्त्यावरील अनेक केबल तोडून टाकलेल्या आहेत. तसेच अनधिकृतपणे केबल टाकून महापालिकेचे नुकसान केल्याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com