वाडिया महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

वाडिया महाविद्यालयात 
वाचन प्रेरणा दिन साजरा
Published on

पुणे, ता. २२ : नौरोसजी वाडिया महाविद्यालयात मराठी विभाग आणि राज्य सरकारचे भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, पुणे यांच्यावतीने वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. यानिमित्ताने महाविद्यालयात मराठी वाङ्‍मय मंडळाचे उद्‍घाटनही झाले. याप्रसंगी साहित्यिक-समीक्षक डॉ. संजय ढोले, भाषा संचालनालयाच्या ज्योती विभूते, सविता सोनटक्के, संस्थेचे विश्‍वस्त प्रा. सचिन सानप, विश्‍वस्त डॉ. अशोक चांडक, प्रबंधक राजेंद्र तागडे, प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार आदी उपस्थित होते. डॉ. ढोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेपुढील आव्हानांची चर्चा केली. विभूते यांनी मराठी भाषेतील रोजगार निर्मिती, भाषा संचालनालयातील कामकाज व कोशनिर्मिती आदींविषयी माहिती दिली. प्रा. चंद्रकांत भवारी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ. अश्‍विनी दळवी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. शोभा सर्वगोड यांनी आभार मानले. प्रा. संजय भांगरे, प्रा. शोभा सर्वगोड यांनी संयोजनासाठी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com